मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्री राम नवमी का व कशी साजरी करतात

                     श्री राम नवमी बद्दल माहिती तिथी :  चैत्र शुद्ध नवमी चैत्र शुद्ध नवमी हा चैत्रातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस रामाचा जन्म झाला.हा दिवस रामनवमी म्हणुन साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो.रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारासमवेतच गाठी पण घालतात.रामज्न्म झाल्यावर फटाके फोडतात.त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रामनवमीचे एक व्रतही आहे. भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी, गुरूवार, पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता. विशेष म्हणजे, महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहण्यास सुरवात केली होती. रामनवमी व्रत कसे करावे? * व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळीच लवकर स्नान आटोपून श्रीरामाचे नामस्मरण करावे. * दुसर्‍या दिवशी (चैत्र शुक्ल नवमीला) ब्रह्म मुहर्तात ऊठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत. * त्यानंतर गोमूत्र, शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे. * 'उपोष्य नवमी त्व यामेष्वष्टसु राघव| तेन प्रीतो भव