बहुगुणी ( अद्रक ) आल्याचे फायदे अद्रक (आले) ही औषधी वनस्पती मानली जाती. आल्यापासून आपल्याला नियमित दिनचर्येमध्ये खूप फायदे होतात. आले सेवनामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते. आल्यामध्ये ९१ टक्के पाणी, २.५ टक्के प्रोटीन, १३ टक्के काबरेहायड्रेट असतात. यामुळेच याला बहुगुणी म्हटले जाते. तर चला पाहूया या आल्याचे आपण किती फायदे करून घेऊ शकतो.? १.खोकला झाल्यावरही हे उपयुक्त असते. आल्याचे बारीक काप करून त्याचे तुकडे व एकसारख्या प्रमाणात मधासोबत गरम करून दिवसातून दोन-तीन वेळा खावे. खोकला येणे बंद होते. त्याचसोबत घशातील खवखवसुद्धा कमी होते. २.तुम्हाला भूक लागत नसेल तर आल्याचे नियमित सेवन करावे, त्याने तुमचे पोट साफ होते व तुम्हाला भूकही लागते. ३.अँसिडिटी या आजारावरही आलं उपकारक आहे. आल्यामध्ये ओवा आणि लिंबूचा रस एकत्र करून त्यात थोडे मिठ टाकून खावे. त्यामुळे पोटाचे आजार कमी होतात व ढेकरही येत नाही. ४.जर वारंवार उलट्या होण्याची समस्या असेल तर आलं कांद्याच्या रसासोबत दोन चमचे प्यावे. यामुळे उलटी होणे थांबत...