घरामधील अडगळ हटवून बना मालामाल फेंगशुईनुसार ‘ धन ‘ म्हणजे अत्यंत येंग अर्थात वेगवान ऊर्जा मानली जाते. घरातील किंवा ऑफिसमधील महत्वपूर्ण अशी ‘ ची ‘ ( फेंगशुईतील सकारात्मक ऊर्जा) हि तुम्हाला स्वत:ला व तुमच्या घरादाराला जास्त धन कमाविण्यासाठी उपयुक्त ठरते. १) अव्यवस्थित व गबाळे राहून धन संचित करता येत नाही. आपले घर साफसूफ व व्यवस्थित ठेवण्याची गरज असते. खासकरून आपली काम करण्याची जागा कटाक्षाने अत्यंत स्वच्छ ठेवा. घरातील अडगळ व भंगार सामान नकारात्मक ऊर्जा निर्माण करते व त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडथळे येतात. २)मोडक्या तोडक्या वस्तू, निरुपयोगी सामान, बंद पडलेली घड्याळे, जुने भंगार सामान, वेळोवेळी हत्वा या वस्तू महत्त्वपूर्ण अशी ‘ ची ‘ ऊर्जा घरातून बाहेर घालवितात. ३)आपल्या बाथरूममधील नळ फिटीग्ज गळकी नसावीत नाहीतर धनहानी होते. ४) आपले पैशांचे पाकीट नेहमी स्वच्छ ठेवा. त्यात पैशांव्यतिरिक्त जुनी बिले, पावत्या व निरुपयोगी कागद ठेवू नका. ५) लाल व पिवळ्या लिली व ग्लोडीयोलास फुलांचा सजावटीमध्ये वापर करा. या फुलात विपुल प्रमाणात येंग एनर्जि असते. लिव्हिंग, रूमम...