मुख्य सामग्रीवर वगळा

घरामधील अडगळ हटवून बना मालामाल

 घरामधील अडगळ हटवून बना मालामाल


फेंगशुईनुसार ‘ धन ‘ म्हणजे अत्यंत येंग अर्थात वेगवान ऊर्जा मानली जाते. घरातील किंवा ऑफिसमधील महत्वपूर्ण अशी ‘ ची ‘ ( फेंगशुईतील सकारात्मक ऊर्जा) हि तुम्हाला स्वत:ला व तुमच्या घरादाराला जास्त धन कमाविण्यासाठी उपयुक्त ठरते.


१) अव्यवस्थित व गबाळे राहून धन संचित करता येत नाही. आपले घर साफसूफ व व्यवस्थित ठेवण्याची गरज असते. खासकरून आपली काम करण्याची जागा कटाक्षाने अत्यंत स्वच्छ ठेवा.
घरातील अडगळ व भंगार सामान नकारात्मक ऊर्जा निर्माण करते व त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडथळे येतात.

२)मोडक्या तोडक्या वस्तू, निरुपयोगी सामान, बंद पडलेली घड्याळे, जुने भंगार सामान, वेळोवेळी हत्वा या वस्तू महत्त्वपूर्ण अशी ‘ ची ‘ ऊर्जा घरातून बाहेर घालवितात.

३)आपल्या बाथरूममधील नळ फिटीग्ज  गळकी  नसावीत नाहीतर धनहानी होते.

४) आपले पैशांचे पाकीट नेहमी स्वच्छ ठेवा. त्यात पैशांव्यतिरिक्त  जुनी बिले, पावत्या व निरुपयोगी कागद ठेवू नका.

५) लाल व पिवळ्या लिली व ग्लोडीयोलास फुलांचा सजावटीमध्ये वापर करा. या फुलात विपुल प्रमाणात येंग एनर्जि असते. लिव्हिंग, रूममधील येंग ऊर्जा वृद्धीसाठी हि फुले उंच फुलदाण्यामध्ये ठेवा.

६) कारंजी हीही ताजी ची ऊर्जा आकर्षून घेण्यासाठी प्रभावी ठरतात . घराच्या दक्षिण- पश्चिम भागात ताज्या पाण्याचे कारंजे धनाला आकर्षित करते. धबधब्यासारखी  जलाकृती घराच्या उत्तर भागात ठेवली तर करिअर उत्तम बनते. जलप्रवाह व धबधब्याचे चित्र लावणेही यासाठी उपयुक्त ठरते, परंतु या चित्रातील पाण्याचा प्रवाह नेहमी वाहता दिसावा.

७) चांगला कंपास ( होकायंत्र )  वापरून तुमच्या घरातील दक्षिण-पूर्व कोपरा जाणून घ्या येथूनच संपत्ती व समृद्धीचे आगमन नियंत्रित होते.

८) घरातील या कोपऱ्यात यासाठी लाल कुंड्यात  मनी प्लांट वा जेड प्लांट लावावेत. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.

९) जर घराच्या या क्षेत्रात गार्डन असेल तर तेथे फळझाडे लावावीत. हि झाडे धनाकर्शक मानली जातात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुळशीचे लग्न सोहळा कसा साजरा करावा

तुळशीचे लग्न करण्याची योग्य पद्धत | Tulsi vivah in by marathi gruhini | तुलसी विवाह पुढील लिंकवर क्लिक करा.... https://youtu.be/FAU0BLXLHwI

रांगोळी डिझाईन

101 Easy Rangoli designs | रांगोळी डिझाईन | simple Rangoli designs पुढील लिंकवर क्लिक करा. https://youtu.be/Vpf6ZnJXLCI

श्रीगुरुचरित्र | Gurucharitra parayan

श्रीगुरुचरित्र हा एक मराठी भाषेंतील ग्रंथ आहे. अनेक प्रकारची संकटे तसेच प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्यांत म्हणून पुष्कळ जण श्रीगुरुदेव दत्त भक्त या ग्रंथाची पारायणे करत असतात.  पारायण करणाराची श्रीगुरुचरित्रावरील अढळ श्रद्धा, भक्ती आणि विश्वास त्याच्यावरील सर्व संकटांचा नाश करून त्याला सर्व प्रकारचे प्रापंचिक सुख तर देतेच पण त्याची आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होते. गुरुचरित्र हे शिष्य नामधारक व गुरु सिद्ध यांच्या संवादाचे भक्तिपूर्ण प्रकटीकरण आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ सरस्वती गंगाधर यांनी लिहिला आहे. गुरुचरित्राचे अध्याय: गुरुचरित्राचे एकंदर बावन्न अध्याय आहेत.  पारायणाच्या पद्धती: पारायण हे सामान्य भक्त सात दिवसांचे करतात. तरी एक दिवसाचे किंवा तीन दिवसांचे पारायण करणारेहि काही भक्त आहेत. शुभ दिवशी, शुभ वेळी पारायण सुरु करावे. दत्तजयंतीच्या आधी दत्त जन्मापर्यंत पारायणासाठी दिवस शुद्धी बघण्याची आवशकता नसते. पारायणासाठी साहित्य: गुलाबाची फुले, हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे, अष्टगंध, हीना अत्तर, रांगोळी, तीन पाट, नारळ पारायणाची पूर्वतय