मुख्य सामग्रीवर वगळा

गरमागरम स्वीट कॉर्न सूप | Recipe Of sweet corn soup

आजारी माणसासाठीही हे सुप फायदेशीर ठरतं. तुम्ही वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तरीदेखील हे सूप तुम्हाला मदत करतं.


 गरमागरम स्वीट कॉर्न सूप | Recipe Of sweet corn soup


स्विट कॉर्न सूप ही एक ऑथेन्टिक चायनिज रेसिपी आहे. तरीही ती फक्त चीनपुरतीच मर्यादित न राहता ते जगभरात लोकप्रिय झालं आहे. तुम्ही या सूपचा लंच किंवा डिनरमध्ये समावेश करू शकता. त्याप्रमाणे आजारी माणसासाठीही हे सुप फायदेशीर ठरतं. तुम्ही वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तरीदेखील हे सूप तुम्हाला मदत करतं. जाणून घेऊयात हे टेस्टी आणि हेल्दी सूप तयार करण्याची रेसिपी...



साहित्य :

200 ग्रॅम स्विट कॉर्न ( मका )
1 ½ कप व्हाइट सॉस
 काळी मिरी पावडर
एक वाटी कांद्याची पात
 मीठ चवीनुसार
5 कप भाज्या उकडण्यासाठी वापरलेलं पाणी (व्हेज स्टॉक)


कृती :

* कॉर्न ( मका ) धुवून ते सुकवून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये बारिक करून घ्या. जास्त बारिक करू नका. थोडसं जाडसरचं ठेवा.

* एका पॅनमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करा. त्यामध्ये व्हेजिटेबल्स स्टॉक गरम करत ठेवा.

* त्यामध्ये ग्राइंड केलेले कॉर्न आणि व्हाइट सॉस एकत्र करा.

* जर तुम्हाला सूप थोडं क्रिमी तयार करायचं असेल तर त्यामध्ये थोडी फ्रेश क्रिम मिक्स करा.

* सूप मध्यम आचेवर उकळून घ्या.

* मीठ आणि काळी मिरी पावडर टाकून एकत्र करा.

*  गरमगरम सूप तयार आहे. बाउलमध्ये काढून वरून कांद्याची पात टाका.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुळशीचे लग्न सोहळा कसा साजरा करावा

तुळशीचे लग्न करण्याची योग्य पद्धत | Tulsi vivah in by marathi gruhini | तुलसी विवाह पुढील लिंकवर क्लिक करा.... https://youtu.be/FAU0BLXLHwI

धनत्रयोदशी पुजा विधी, साहित्य, शुभ मुहूर्त संपुर्ण माहिती | Dhanteras in...

नवरात्रीत कन्या पूजनात एक मुलगा का आवश्यक आहे | Navratri Kanya in marath...