मुख्य सामग्रीवर वगळा

मंदिरात कासव का असते


श्रीविष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते  कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. त्याला त्याच्यातील सत्त्वगुणामुळे ज्ञानही प्राप्‍त होत असते. या ज्ञानामुळेच त्याला `स्वत:ची कुंडलिनी जागृत व्हावी', अशी इच्छा निर्माण झाली. कासवाने श्रीविष्णूला प्रार्थना केल्यावर त्याने कासवाला मंदिरात गाभार्‍याच्या समोर स्थान प्राप्‍त होण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते.

 कासव हे श्रीविष्‍णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते.

काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्रीविष्‍णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे. आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.

   कासवाचे गुण

1)कासवाला ६ पाय असतात तसेच माणसाला ६ शत्रु असतात

काम ,क्रोध ,मोह ,लोभ ,मोह आणि मत्सर

कासव हे सर्व सोडुन नतमस्तक होते त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडुन मंदिरात यावे

2) कासव हे आपल्या पिलाना डोळ्यातुन प्रेम देवून वाढवते त्याच प्रमाणे देवाने आपल्या वर क्रूपा द्रुष्टी ठेवावी ही भावना आहे.

3) कासव आपली अष्ट अंग नमस्कार करते त्याप्रमाणे आपण पण करावा

४) कासव ज्याप्रमाणे त्याची सर्व इंद्रिये त्याच्या इच्छेने संकोचून घेवू शकते त्याप्रमाणे मंदिरात देवासामोर जाताना भक्ताचा इंद्रियनिग्रह, इंद्रियांवर ताबा असणे महत्त्वाचे आहे. इंद्रिये मोकाट सोडून परमेश्वराची भक्ती होवू शकत नाही हे कासव आपल्याला शिकवते.

यांकरीता कासव मंदिरात असते

कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा भावार्थ

कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्‍वराचे खरे दर्शन घडते’, असा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुळशीचे लग्न सोहळा कसा साजरा करावा

तुळशीचे लग्न करण्याची योग्य पद्धत | Tulsi vivah in by marathi gruhini | तुलसी विवाह पुढील लिंकवर क्लिक करा.... https://youtu.be/FAU0BLXLHwI

धनत्रयोदशी पुजा विधी, साहित्य, शुभ मुहूर्त संपुर्ण माहिती | Dhanteras in...

नवरात्रीत कन्या पूजनात एक मुलगा का आवश्यक आहे | Navratri Kanya in marath...