मुख्य सामग्रीवर वगळा

श्रीगुरुचरित्र | Gurucharitra parayan

श्रीगुरुचरित्र हा एक मराठी भाषेंतील ग्रंथ आहे. अनेक प्रकारची संकटे तसेच प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्यांत म्हणून पुष्कळ जण श्रीगुरुदेव दत्त भक्त या ग्रंथाची पारायणे करत असतात.




 पारायण करणाराची श्रीगुरुचरित्रावरील अढळ श्रद्धा, भक्ती आणि विश्वास त्याच्यावरील सर्व संकटांचा नाश करून त्याला सर्व प्रकारचे प्रापंचिक सुख तर देतेच पण त्याची आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होते.
गुरुचरित्र हे शिष्य नामधारक व गुरु सिद्ध यांच्या संवादाचे भक्तिपूर्ण प्रकटीकरण आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ सरस्वती गंगाधर यांनी लिहिला आहे.

गुरुचरित्राचे अध्याय: गुरुचरित्राचे एकंदर बावन्न अध्याय आहेत. 


पारायणाच्या पद्धती: पारायण हे सामान्य भक्त सात दिवसांचे करतात. तरी एक दिवसाचे किंवा तीन दिवसांचे पारायण करणारेहि काही भक्त आहेत. शुभ दिवशी, शुभ वेळी पारायण सुरु करावे. दत्तजयंतीच्या आधी दत्त जन्मापर्यंत पारायणासाठी दिवस शुद्धी बघण्याची आवशकता नसते.

पारायणासाठी साहित्य: गुलाबाची फुले, हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे, अष्टगंध, हीना अत्तर, रांगोळी, तीन पाट, नारळ

पारायणाची पूर्वतयारी : पारायणाला शुचिर्भूत शरीराने व मनाने बसावे. आंघोळ करून संध्यादि व देवांची पूजा करावी. देवाला व घरांतील वडिलधार्‍यांना नमस्कार करावा. पारायणाला बसण्याची जागा स्वच्छ करून, रांगोळी घालून तीन पाट अगर आसने मांडावीत. दोन आसने समोरासमोर मांडावीत व एक आसन बाजूस मांडावे. वाचणार्याचे तोंड पूर्वेस अगर उत्तरेस असावे. आपल्या समोर चौरंगावर श्री गुरुदेव दत्तांची तजबीर ठेवावी. त्याची पूजा करून हार घालून समोर गुरुचरित्राची पोथी घेऊन पोथीचीही पूजा करावी. कलश स्थापना व त्याचे पूजन करावे.तुपाचे निरांजन सतत समोर तेवत असावे. सातही दिवस वाचनाची जागा एकच असावी. पारायण कशासाठी करत आहोत त्याचा उच्चार करून संकल्प सोडावा व वाचनाला सुरवात करावी. वाचन मोठ्यानेच करावे मनांत करू नये. पारायण चालू असताना फोन/मोबाईल बंद ठेवावा. कोठच्याही प्रकारचे बोलणे पारायण चालू असताना करू नये. वाचन सुरु असताना एकाग्रता अतिशय महत्वाची आहे. वाचनांत एकाग्रतेने मनाने एकरूप व्हावे. काही विशिष्ट परिस्थितींत एकेका अध्यायाचे पारायण करण्याचीही प्रथा आहे.

प्रत्येक दिवशी अध्यायांचे वाचन:

पहिल्या दिवशी: १ ते  ७ अध्याय

दुसर्या दिवशी:   ८ ते १८ अध्याय

तिसर्या दिवशी: १९ ते २८ अध्याय

चौथ्या दिवशी: २९ ते ३४ अध्याय

पाचव्या दिवशी: ३५ ते ३७ अध्याय

सहाव्या दिवशी: ३८ ते ४३ अध्याय

सातव्या दिवशी: ४४ ते ५२ अध्याय

अशा प्रकारे सात दिवसांचे पारायण करावे. प्रत्येक दिवशी वाचन झाल्यावर नमस्कार करून उठावे. काहीतरी खावे. दिवसभर शुद्ध मनाने राहावे व रात्री भूमीवर शयन करावे. ब्रह्मचर्याचे पालन पारायण चालू असताना करावे. सात दिवस पारायण झाल्यावर अनुष्ठान म्हणून ब्राह्मण सुवासिनीला भोजन-दक्षिणा द्यावी. जेवणांत पुरणपोळी व घेवड्याची भाजी अवश्य करावी. अशा रीतीने पारायण पुरे करावे.

अध्यायांचे महत्व: संपूर्ण ग्रंथाचे पारायण करणे अशक्य असेल तेव्हां आपल्या अडचणीनुसार फक्त विशिष्ट अध्यायाचेच पारायण करण्याचीही प्रथा आहे.

अध्याय १ : सद्गुरू प्राप्तीसाठी वाचावा.

अध्याय २: श्रीगुरुकृपा व्हावी म्हणून वाचावा.

अध्याय ४: श्रीदत्त जन्माचा अध्याय.

अध्याय १३: उत्तम आरोग्य प्राप्ती व्हावी व रोग मुक्तीसाठी वाचावा.

अध्याय १४: प्रापंचिक अडीअडचणी दूर व्हाव्यांत म्हणून वाचावा.

अध्याय १८: दारिद्र्य दूर व्हावे म्हणून वाचावा.

अध्याय २० व २१ : संततीच्या आरोग्यासाठी म्हणून वाचावा.

अध्याय ३९ : संतती प्राप्तीसाठी म्हणून वाचावा.

अध्याय ३९ चे पारायण करण्याआधी श्लोक म्हणावा.

नमस्ते योगिराजेंद्र दत्तात्रेयदयानिधे I

षष्ठीवर्ष वयस्कायाः वंध्यायाः पुत्रदानवान् II

तद्वन्मेयि कृपाकृत्वा श्रीशंभक्तं चिरायुषं I

देहि मे तनयं दत्त त्वामहं शरणागतः II

श्रीमद्वासुदेवानन्द सरस्वती टेंबे स्वामीमहाराज यांनी श्रीगुरूचरित्रावर संस्कृतमध्ये द्विसाहस्री, श्रीगुरुसंहिता हे ग्रंथ आणि त्रिशति गुरुचरित्र काव्य लिहिले आहेत. त्यांनी मराठीमध्ये सप्तशती गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे.

पारायणाचे लाभ: गुरुचरित्र पारायणामुळे आरोग्य, पुत्रप्राप्ती, संतती, धन, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, सर्व संकटांचे निवारण, भूतबाधा व करणी यांपासून मुक्तता, रोगापासून सुटका होऊन सुदृढ आरोग्य लाभणे,पारमार्थिक गुरुकृपा, सद्गुरुप्राप्ती, जीवनांत शांती आणि अंती मोक्ष अशा अनेक प्रकारचे लाभ होतात.

अशा रीतीने श्रीगुरुचरित्र हा प्रासादिक ग्रंथ सध्याच्या तणावग्रस्त जीवनांत आपल्यासाठी एक प्रकारची संजीवनी देणारा आहे. अशा या श्रीगुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाने दत्तभक्तांचे सर्व प्रकारचे शुभ मनोरथ पूर्ण व्हावेत आणि त्यांच्या जीवनांत सुख, शांती आणि समृद्धी यांचा लाभ व्हावा हीच श्री गुरुदेव दत्त चरणी प्रार्थना.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रांगोळी डिझाईन

101 Easy Rangoli designs | रांगोळी डिझाईन | simple Rangoli designs पुढील लिंकवर क्लिक करा. https://youtu.be/Vpf6ZnJXLCI

देवाच्या सोप्या रांगोळ्या | Easy Rangoli Holy sings - 1 Marathi Gruhini

देवाच्या सोप्या रांगोळ्या | Easy Rangoli Holy sings  - 1 Marathi Gruhini https://youtu.be/iJ5lbZiGY8c

दागिन्याचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे - मराठी गृहिणी

दागिन्याचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे सौंदर्यवृद्धी करण्याबरोबरच दागिने आपल्या शरीरस्वास्थ्याचीही काळजी घेतात आणि काही रोग बरे करण्यास मदत करतात, असे आयुर्वेद सांगतो. ज्या धातूचे दागिने असतात त्यांचा प्रभाव शरीरावर होतो. ते आपल्या शरीरातील काही नलिकाबिंदूंवर दबाव टाकतात आणि त्यामुळे शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते आणि मन व शरीर प्रसन्न राहते. आयुर्वेदाच्या अनुसार सोन्याच्या दागिन्यांना कमरेच्या वरील भागातील अंगावर तर चांदीच्या दागिन्यांना संपूर्ण शरीरभर परिधान केले पाहिजे, असे मानले जाते. ◆ अंगठी ◆ हाताच्या प्रत्येक बोटात अंगठी घालण्याची पद्धत आहे. अंगठी बोटात घातल्यास ती अनेक प्रकारच्या रोगांवर प्रभावी ठरते. मसलन आणि कनिष्टिका म्हणजे शेवटचे लहान बोट (करंगळी) आणि तिच्या जवळचे बोट यांच्यात अंगठी घातली की घबराट, हृदयरोग, हृदयशूल आणि मानसिक तणाव यांपासून होणारा त्रास कमी होतो. कफासंबंधीच्या तक्रारी, प्लिहा, लिव्हर याबाबतीतल्या ज्या तक्रारी असतात, त्या सोन्याची अंगठी घातली असता कमी होतात, तर पित्त-वाताच्या विकारांवर व पचनासंबंधीच्या तक्रारींबाबत चांदीची अंगठी घालणे फायदे