मुख्य सामग्रीवर वगळा

ब्लड प्रेशर नियंत्रणासाठी घरगुती उपाय

       ब्लड प्रेशर नियंत्रणासाठी घरगुती उपाय



ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या यामुळे ब्लडप्रेशरचे रूग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. 


ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. तुम्हालाही ब्लडप्रेशरचा त्रास असेल तर तुम्ही हे घरुगुती उपाय अवश्य करून पाहा. या उपायांनी तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यात मदत होईल.


लसूण 



ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण अमृतासमान औषधी आहे. यामध्ये एलिसीन नावाचे तत्त्व असते, जे नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढवते आणि यामुळे आपल्या मासपेशींना आराम मिळतो. ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीला आराम मिळतो. यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज लसणाची एक पाकळी अवश्य खावी.

शेवगा 


यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन तसेच खनिज लवण आढळून येतात. एका संशोधनानुसार, या झाडाच्या पानांचा अर्क पिल्यास ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीवर सकारत्मक प्रबाव पडतो. ब्लडप्रेशरच्या रुग्णाने मसूरच्या डाळीसोबत शेवग्याचे सेवन करावे.

जवस 


जवसामध्ये अल्फा लिनोनेलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमणात असते. हे एक प्रकारचे महत्त्वपूर्ण ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आहे. विविध संशोधनामध्ये समोर आले आहे, की ज्या लोकांना हायपरटेन्शनची समस्या असेल त्यांनी जेवणात जवसाचा उपयोग अवश्य करावा. यामुळे कॉलेस्टेरॉलची मात्रा कमी होते आणि याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.

विलायची 


एका संशोधनानुसार विलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. याच्या सेवनाने शरीराला अँटीऑक्सीडेंट मिळतात तसेच रक्तप्रवाह सुरळीत राहतो.

आवळा 


दररोज आवळ्याचे सेवन केल्यास ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन 'सी' असते. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि कॉलेस्टेरॉलही नियंत्रणात राहते.

दालचिनी 


दालचिनीच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. एवढेच नाही तर दालचिनी आपला रक्तप्रवाह नियमित ठेवते.

मुळा



ही एक साधारण भाजी आहे. मुळा खाल्ल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. मुळ्याची भाजी करून किंवा कच्चा खाल्ल्यास शरीराला मिनरल्स आणि योग्य प्रमाणात पोटॅशियम मिळते.

कांदा 


कांद्याच्या नियमित सेवनाने कॉलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. यामध्ये क्योरसेटिन नावाचे तत्व असते, जे हृदयाच्या आजारांपासून आपले रक्षण करते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुळशीचे लग्न सोहळा कसा साजरा करावा

तुळशीचे लग्न करण्याची योग्य पद्धत | Tulsi vivah in by marathi gruhini | तुलसी विवाह पुढील लिंकवर क्लिक करा.... https://youtu.be/FAU0BLXLHwI

रांगोळी डिझाईन

101 Easy Rangoli designs | रांगोळी डिझाईन | simple Rangoli designs पुढील लिंकवर क्लिक करा. https://youtu.be/Vpf6ZnJXLCI

श्रीगुरुचरित्र | Gurucharitra parayan

श्रीगुरुचरित्र हा एक मराठी भाषेंतील ग्रंथ आहे. अनेक प्रकारची संकटे तसेच प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्यांत म्हणून पुष्कळ जण श्रीगुरुदेव दत्त भक्त या ग्रंथाची पारायणे करत असतात.  पारायण करणाराची श्रीगुरुचरित्रावरील अढळ श्रद्धा, भक्ती आणि विश्वास त्याच्यावरील सर्व संकटांचा नाश करून त्याला सर्व प्रकारचे प्रापंचिक सुख तर देतेच पण त्याची आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होते. गुरुचरित्र हे शिष्य नामधारक व गुरु सिद्ध यांच्या संवादाचे भक्तिपूर्ण प्रकटीकरण आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ सरस्वती गंगाधर यांनी लिहिला आहे. गुरुचरित्राचे अध्याय: गुरुचरित्राचे एकंदर बावन्न अध्याय आहेत.  पारायणाच्या पद्धती: पारायण हे सामान्य भक्त सात दिवसांचे करतात. तरी एक दिवसाचे किंवा तीन दिवसांचे पारायण करणारेहि काही भक्त आहेत. शुभ दिवशी, शुभ वेळी पारायण सुरु करावे. दत्तजयंतीच्या आधी दत्त जन्मापर्यंत पारायणासाठी दिवस शुद्धी बघण्याची आवशकता नसते. पारायणासाठी साहित्य: गुलाबाची फुले, हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे, अष्टगंध, हीना अत्तर, रांगोळी, तीन पाट, नारळ पारायणाची पूर्वतय