मुख्य सामग्रीवर वगळा

दिवाळीनंतर शरीर डिटॉक्स करा ह्या घरगुती उपायाने

         दिवाळीनंतर शरीर डिटॉक्स  करा ह्या                                  घरगुती उपायाने



       सणाच्या दिवसांत किती ही नको म्हटलं तरी जास्त खाणं हे होतंच. कधी उत्साहाच्या भरात तर कधी आग्रहाखातर आपण एक घास किंवा गोडाधोडाचे पदार्थ अधिकच खातो. या सगळ्या गोष्टी दिवाळीच्या पहिल्या पाच दिवसांत तर आवर्जून होतातच. 


      कारण या दिवसांत तुम्हाला दिवाळीचा फराळ आणि मिठाई हे पदार्थ अधिक आकर्षित करतातच. पण अशावेळी मनात कोणताही विचार न आणता दिवाळी मस्त आनंदाने साजरी करावी. आणि त्यानंतर शरीर डिटॉक्स  करण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी पुढे चार उपाय दिले आहेत जे तुम्हाला खूप उपयोगी येतील


1) लिंबू 



लिंबूमध्ये योग्य प्रमाणात विटामीन सी असतं. लींबूमुळे तुम्ही सर्दी आणि खोकल्यापासून स्वतःचा बचाव करू शकता. तसेच लींबू तुमची पचनशक्ती देखील चांगली करत. लिंबाची साल देखील अँटी ऑक्सिडेट्स असते यामुळे डिटॉक्सिफिकेशन अधिक होते. 

2) कोथिंबीर



कोथिंबीरमुळे देखील पचनशक्ती चांगली होते. यामुळे कोलेस्ट्रॉल देखील चांगला राहतो. कोथिंबिरीमुळे शरीरातील लेड आणि मरकरीचे प्रमाण कमी होऊन त्याचे डिटॉक्स होते. कोथिंबीर तुम्ही सलाड, डाळ आणि कढीमध्ये भरपूर प्रमाणात टाकून खावू शकतात.


3) टॉमेटो



टॉमेटो तुमच्या शरीरातील डिटॉक्स अतिशय चांगल्या प्रमाणात करतात. सणाच्या दिवसांत जेवण अधिक झाल्यावर शरीरात समतोल राखण्यासाठी पुढच्या जेवणात टॉमेटोचा वापर अधिक करावा.

4) दही 



एक वाटी दही कायमच शरीरासाठी चांगल असतं. दह्यामध्ये प्रोबायॉटिक्स असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील पचनशक्ती सुधारते. कारण यामध्ये उपयुक्त बॅक्टेरिया असतात ज्याने अन्न पचनास मदत होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुळशीचे लग्न सोहळा कसा साजरा करावा

तुळशीचे लग्न करण्याची योग्य पद्धत | Tulsi vivah in by marathi gruhini | तुलसी विवाह पुढील लिंकवर क्लिक करा.... https://youtu.be/FAU0BLXLHwI

धनत्रयोदशी पुजा विधी, साहित्य, शुभ मुहूर्त संपुर्ण माहिती | Dhanteras in...

नवरात्रीत कन्या पूजनात एक मुलगा का आवश्यक आहे | Navratri Kanya in marath...