मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दागिन्याचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे - मराठी गृहिणी

दागिन्याचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे सौंदर्यवृद्धी करण्याबरोबरच दागिने आपल्या शरीरस्वास्थ्याचीही काळजी घेतात आणि काही रोग बरे करण्यास मदत करतात, असे आयुर्वेद सांगतो. ज्या धातूचे दागिने असतात त्यांचा प्रभाव शरीरावर होतो. ते आपल्या शरीरातील काही नलिकाबिंदूंवर दबाव टाकतात आणि त्यामुळे शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते आणि मन व शरीर प्रसन्न राहते. आयुर्वेदाच्या अनुसार सोन्याच्या दागिन्यांना कमरेच्या वरील भागातील अंगावर तर चांदीच्या दागिन्यांना संपूर्ण शरीरभर परिधान केले पाहिजे, असे मानले जाते. ◆ अंगठी ◆ हाताच्या प्रत्येक बोटात अंगठी घालण्याची पद्धत आहे. अंगठी बोटात घातल्यास ती अनेक प्रकारच्या रोगांवर प्रभावी ठरते. मसलन आणि कनिष्टिका म्हणजे शेवटचे लहान बोट (करंगळी) आणि तिच्या जवळचे बोट यांच्यात अंगठी घातली की घबराट, हृदयरोग, हृदयशूल आणि मानसिक तणाव यांपासून होणारा त्रास कमी होतो. कफासंबंधीच्या तक्रारी, प्लिहा, लिव्हर याबाबतीतल्या ज्या तक्रारी असतात, त्या सोन्याची अंगठी घातली असता कमी होतात, तर पित्त-वाताच्या विकारांवर व पचनासंबंधीच्या तक्रारींबाबत चांदीची अंगठी घालणे फायदे

*दररोजच्या भाज्यांची टेस्ट वाढवण्यासाठी साठी सोप्या ग्रेव्ही रेसिपीज*

*दररोजच्या भाज्यांची टेस्ट वाढवण्यासाठी साठी सोप्या ग्रेव्ही रेसिपीज | Kitchen tips | MarathiGruhini *१)फटाफट ग्रेवी* कांदा, लसुन, आलं, हिरवी मिरची आणि टोम्याटो बारीक करून त्यात बडीशेप पावडर, तिखट, जिरे, हिंग, धने पावडर, हळद आणि गरम मसाला घालून शिजवा. किंवा कांदा उकडून पेस्ट करून त्यात वरील सगळे साहित्य घालून पण पेस्ट करता येईल. *२) दह्या ची ग्रेव्ही* दही, तिखट, हळद, धने पावडर, हिरव्या मिरची ला नीट मिक्स करून तुपाच्या फोडणीत जिरे, हिंग घालून त्यात मिश्रण टाका आणी शिजवा त्यात मीठ आणी कोथिंबीर टाका. *३) ग्रीन ग्रेव्ही* पालक उकडून बाजूला ठेवा. त्यात परतलेला कांदा, लसूण, आलं, मिरची, टोम्याटो ची पेस्ट करा. एक प्यान मध्ये तेल घेऊन जिरे हिंग जोडणी करून त्यात कांद्याची पेस्ट परतून घ्या त्यात त्यात उकडलेला पालक पेस्ट घालून त्यात मीठ आणि गरम मसाला घालून शिजवा. *४) बिना कांदा लसूण ग्रेव्ही* खोवलेला नारळ, भिजवलेली खसखस, आलं, मिरची, काजू पेस्ट, टोम्याटो पेस्ट एक प्यान मध्ये फोडणी करून त्यात वरील मिश्रण घालून थोडं मीठ घालून शिजवा. *५) टोम्याटो ग्रेव्ही* टोम्याटो प्युरी,