मुख्य सामग्रीवर वगळा

*दररोजच्या भाज्यांची टेस्ट वाढवण्यासाठी साठी सोप्या ग्रेव्ही रेसिपीज*

*दररोजच्या भाज्यांची टेस्ट वाढवण्यासाठी साठी सोप्या ग्रेव्ही रेसिपीज | Kitchen tips | MarathiGruhini


*१)फटाफट ग्रेवी*


कांदा, लसुन, आलं, हिरवी मिरची आणि टोम्याटो बारीक करून त्यात बडीशेप पावडर, तिखट, जिरे, हिंग, धने पावडर, हळद आणि गरम मसाला घालून शिजवा.
किंवा
कांदा उकडून पेस्ट करून त्यात वरील सगळे साहित्य घालून पण पेस्ट करता येईल.

*२) दह्या ची ग्रेव्ही*


दही, तिखट, हळद, धने पावडर, हिरव्या मिरची ला नीट मिक्स करून तुपाच्या फोडणीत जिरे, हिंग घालून त्यात मिश्रण टाका आणी शिजवा त्यात मीठ आणी कोथिंबीर टाका.

*३) ग्रीन ग्रेव्ही*


पालक उकडून बाजूला ठेवा. त्यात परतलेला कांदा, लसूण, आलं, मिरची, टोम्याटो ची पेस्ट करा. एक प्यान मध्ये तेल घेऊन जिरे हिंग जोडणी करून त्यात कांद्याची पेस्ट परतून घ्या त्यात त्यात उकडलेला पालक पेस्ट घालून त्यात मीठ आणि गरम मसाला घालून शिजवा.

*४) बिना कांदा लसूण ग्रेव्ही*


खोवलेला नारळ, भिजवलेली खसखस, आलं, मिरची, काजू पेस्ट, टोम्याटो पेस्ट एक प्यान मध्ये फोडणी करून त्यात वरील मिश्रण घालून थोडं मीठ घालून शिजवा.

*५) टोम्याटो ग्रेव्ही*


टोम्याटो प्युरी, तिखट, धने पावडर, बडीशेफ पूड, हळद, थोडी साखर, फ्रेश क्रीम, कसूरी मेथी, टोस्ट चा चूरा मीठ फोडनित घालून शिजवून मस्त ग्रेव्ही तयार करा.

*६) व्हाईट ग्रेव्ही*


भीजवलेली खसखस व काजू, बडीशेफ, वेलदोडे, लवंग आणि दूध घालून पेस्ट करून घ्या. एका प्यान मध्ये तूप घेऊन जिरे आणी दालचिनी तुकडा घालून फोडणी करा. त्यात काजू-खसखस ची ग्रेव्ही घालून शिजवा शेवटी थोडं आजून दूध घालून उकळा आणि ग्रेव्ही तयार.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुळशीचे लग्न सोहळा कसा साजरा करावा

तुळशीचे लग्न करण्याची योग्य पद्धत | Tulsi vivah in by marathi gruhini | तुलसी विवाह पुढील लिंकवर क्लिक करा.... https://youtu.be/FAU0BLXLHwI

धनत्रयोदशी पुजा विधी, साहित्य, शुभ मुहूर्त संपुर्ण माहिती | Dhanteras in...

नवरात्रीत कन्या पूजनात एक मुलगा का आवश्यक आहे | Navratri Kanya in marath...